04:04pm | Mar 18, 2021 |
पुसेगाव: पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाची बुधवार दि. 3 मार्च व गुरूवार दि.4 मार्च 2021 रोजी नॅक समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. सदर समितीमध्ये जी.एन.विद्यापीठ, हिसार.(हरियाना) माजी कुलगुरू डॉ.राधे श्याम शर्मा, जी.एल.एस.विद्यापीठ, अहमदाबाद (गुजरात) डॉ.अश्विन पुरोहित, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज निपाणी. (कर्नाटक) चे प्राचार्य डॉ.महावीर कोठाळे यांचा समावेश होता.
त्यांनी महाविद्यालयाच्या नॅक निकषाची पाहणी केली. त्यानुसार महाविद्यालयास नॅक कडून 2.98 CGP A बी++ ग्रेड प्राप्त झाल्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.एस.शिवणकर, सहसचिव प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांच्याकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांचे अभिनंदन केले.
यापूर्वी महाविद्यालयास 2.29 CGP A मिळाला होता. व महाविद्यालयास बी हे मानांकन प्राप्त झाले होते. पुनर्मूल्यांकनाच्या तिसर्या सायकलमध्ये 2.98 CGP A प्राप्त झाला असून महाविद्यालयास बी++मानांकन मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे यांनी दिली. तसेच शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेत सामाजिक शास्त्रे विद्या शाखेतून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रशस्तीपत्रक गौरवपूर्वक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मिळाले आहे. या पुनर्मूल्यांकनामध्ये रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, ग्रामस्थ, यांनी पुनर्मूल्यांकन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
या पुर्नमुल्यांकनामुळे महाविद्यालयास महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग ,रुसा यांच्याकडून अनुदान मिळण्यास मदत होणार असल्याचे, प्राचार्य डॉ.कैलास जगदाळे यांनी कळविले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |