01:03pm | Jun 05, 2020 |
गांधीनगर: गुजरात राज्यसभा निवडणूकीपूर्वी राजकीय भूकंप होवू लागले आहेत. भाजपाने संख्याबळ नसताना तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने दोन उमेदवार दिले असले तरी दुसरी जागा धोक्यात आहे. काँग्रेसचे संख्याबळ काठावर असल्याने भाजपाची खेळी यशस्वी होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी गुरूवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानं राजीनामा देणार्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या 8 वर गेली आहे.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह राज्यात तीन उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. निवडणुकीची नवी तारीख जाहीर झाल्यावर आणखी दोन आमदारांनी गुरुवारी राजीनामे सादर केले. राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या सात झाली होती. त्यानंतर आणखी काही आमदार राजीनामे देतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. भाजपाचा दावा खरा ठरताना दिसत आहे.
शुक्रवारी काँग्रेसच्या आणखी एका आमदारानं राजीनामा दिला आहे. राज्यसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसच्या आठव्या आमदारानं राजीनामा दिला. गुजरात विधानसभेच्या अधिकार्यांच्या हवाल्यानं ‘पीटीआय’नं हे वृत्त दिलं आहे.
दोन जागा जिंकण्यासाठी काँग्रेसकडे काठावरचे संख्याबळ होते. त्यात आठ आमदारांच्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले. परिणामी काँग्रेसची दुसरी जागा निवडून येणे कठीण मानले जात आहे. आमदारांचे संख्याबळ घटल्याने एकूण मतदारांचे प्रमाण कमी होऊन उमेदवारांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचे प्रमाणही कमी झाले आहे. नव्या संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. कारण तीन उमेदवारांच्या विजयासाठी भाजपकडे आता पुरेशी मते उपलब्ध असणार आहेत. दोन वर्षांपूर्वी अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपने काँग्रेस आमदारांची फोडाफोडी केली होती; पण पटेल यांना निसटता विजय मिळाला होता.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |