11:55am | Apr 18, 2021 |
पुसेगाव : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंत 'कडक निर्बंध' लावण्यात आले आहेत. मात्र या अंशतः टाळेबंदीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन पुसेगाव (ता. खटाव) येथील काही नागरिक करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक व्यवसायांना संख्या मुभा देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत असून सुरक्षित अंतराच्या नियमाकडेही दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, अशा सूचना महसूल, पोलीस आरोग्य प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करुन अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बहुतांश नागरिकांची भ्रमंती सुरू असल्याचे चित्र येथील रस्त्यांवर दिसून येत आहे.
सद्यस्थितीत पुसेगावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाही "डॉक्टरकडे निघालो आहे, औषध आणायला जातो आहे, शेतीची खते आणायला चाललोय, बँकेत चाललोय, शेतातून आलोय, रेशनिंग आणायला चाललो आहे" अशी एकापेक्षा एक खोटी अत्यावश्यक सेवेतील कारणे देऊन नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे कित्येक वाहनचालक, नागरिक डॉक्टरांकडे जायचे आहे म्हणून जुनेच प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर पडत आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने बहुतांश नागरिक घराबाहेर पडून स्वत:च्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. परिणामी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक भ्रमंती करत असल्याने प्रशासन टाळेबंदी का करतेय? याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळून कोरोना हद्दपार होईपर्यंत स्वतःला ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाने आवश्यक गोष्टीसाठीच घराबाहेर पडण्याची मनाशी खूणगाठ बांधणे आवश्यक झाले आहे. सध्या, शासकीय नियमांचे कडक पालन केले तर आणि तरच आपण ही कोरोना सोबतची लढाई जिंकू शकतो. यासाठी पुसेगावसह परिसरातील नागरिकांनी खऱ्या अर्थाने आता स्वतः ‘जनता कर्फ्यू’ पाळणे गरजेचे झाले आहे.
विनाकारण भ्रमंती करणाऱ्या नागरिकांना नियमानुसार पोलिसांनी विचारणा केली तर दवाखाना, मेडिकल, कृषी, रेशनिंग अशी अत्यावश्यक सेवेतील खोटी एकापेक्षा एक कारणे बहुतांश नागरिक देत आहेत. यामुळे पोलीस प्रशासन नागरिकांना अडविण्यात हतबल होत असल्याचे चित्र आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |