03:33pm | Jul 14, 2020 |
जयपूर : राजस्थानमध्ये सुरू असलेले सत्तानाट्य सध्या भाजपाच्या पथ्यावर पडताना दिसू लागले आहे. राजस्थान मधील बंडखोर नेते सचिन पायलट यांची काँग्रेसने सर्व पदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सचिन पायलट यांच्यासारखा नेता भाजपला मिळाला तर हा संपूर्ण राजस्थानमध्ये प्रभाव वाढवणारा प्रसंग असेल. सचिन पायलट यांनी राजस्थानमधील जातीय समीकरणाला एक नवं वळण दिलेलं आहे. गुज्जर आणि मीना समुदायातील पायलट यांचा प्रभाव हा भाजपसाठी लॉटरी ठरू शकतो.
सचिन पायलट यांनी बंडखोरी केली असली तरी अत्यंत महत्त्वाच्या दोन समुदायातील आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीला दांडी मारणार्या बैठकीत मीना समुदायाच्या किमान पाच आमदारांचा समावेश आहे. गुज्जर नेता म्हणून ओळख असलेल्या सचिन पायलट यांच्यामागे मीना समुदायातील लोकप्रतिनिधी ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच भाजप आता गप्प बसणार नाही, असं जाणकार सांगतात.
दरम्यान, आपण भाजपात जाणार नाही, असं सचिन पायलट यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. पण एका दगडात दोन पक्षी मारता येत असतील तर भाजप नेतृत्त्वही शांत बसणार नाही हे राजस्थानमधील नेतेही ओळखतात. कॅबिनेट मंत्री रमेश मीना आणि हरिश मीना यांचाही बंडखोर आमदारांमध्ये समावेश आहे. सचिन पायलट यांना आपला नेता मानत या आमदारांनी थेट काँग्रेस हायकमांडविरोधातच बंड पुकारलं. काही वर्षांपूर्वी गुज्जर आणि मीना समाज आपला अनुसूचित जातीत समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता.
2014 ला दौसामधून लोकसभेत विजय मिळवल्यानंतर सचिन पायलट यांनी गुज्जर-मीना समुदायाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पूर्व् राजस्थानमध्ये यासाठी दोन्ही समुदायांच्याय नेत्यांसह अनेक रॅली झाल्या. दौसा, सवाई माधोपूर, भरतपूर, जयपूर ग्रामीण आणि कुराली या भागांमध्ये या दोन समुदायांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. 2018 मध्ये सचिन पायलट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. या भागात काँग्रेसने 49 पैकी 42 जागा जिंकत भाजपचा सुपडासाफ केला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |