12:49pm | May 01, 2021 |
नवी दिल्ली : दिवसेंदिवस भारता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती व्यक्त केली जावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतातच काही आठवड्यांच्या लॉकडाऊन गरजेचा असल्याचे मत अमेरिकेतील प्रख्यात साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत डॉ.फौसी बोलताना म्हणाले, ‘त्वरीत’ काही दिवस देशात ‘संपूर्ण लॉकडाऊन’ लागू केल्यास कोविडवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ.अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत.
बायडन प्रशासनाचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी लसीकरण मोहिमेला जोर देण्याची गरजही व्यक्त केली. पुढच्या काही आठवड्यांत लसीकरण मोहिमेला वेग धेण्यात आला तर या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकेल. कारण, सध्या भारतात अत्यंत गोंधळाचं वातावरण आहे. लोक रस्त्यांवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन धावताना दिसत आहेत. रुग्णालयांत दाखल होण्यासाठीही रुग्ण रांगेत उभे असल्याचं दिसून येतंय.
भारतात सध्या अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि बेडसाठी झगडावं लागत आहे. औषधांचा काळाबाजार सुरू आहे. लोक आणि प्रशासन हतबल होताना दिसत आहेत. काय करावं? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. नियंत्रणाबाहेर जाणार्या करोनामुळे भारत सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. अशावेळी ‘त्वरीत’ काय करता येऊ शकतं? अशा स्थितीत देशासमोर काही आठवड्यांसाठी संपूर्ण हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |