03:25pm | Jan 12, 2021 |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली व समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा करण्यासाठी ही समिती बनवण्यात येईल.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेद्वारे तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारची कानउघाडणी केली. नव्या कृषी कायद्यांना तुम्ही स्थगिती द्या, अन्यथा आम्ही देऊ, अशा शब्दांत केंद्राला ठणकवताना न्यायालयाने तोडग्यासाठी समिती नेमण्याचा पुनरूच्चार केला होता. त्यानुसार, आज सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
आज सुनावणीत काय झालं ?
संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना देण्यात आलेले आव्हान आणि दिल्ली सीमेवरुन शेतकऱ्यांना हटवण्यासंदर्भात दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली .
वकिल एम.एल.शर्मा यांनी केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने स्थापन केलेल्या कुठल्याही समितीसमोर शेतकरी हजर होणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितल्याचे एम.एल.शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले.
“कायद्याच्या वैधतेची तसेच नागरिकांच्या जीवाची आणि नागरिकांच्या संपत्तीची आम्हाला चिंता आहे. आमच्याकडे जे अधिकार आहेत, त्या अंतर्गत आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. कायद्याला स्थगिती देणे आणि समिती स्थापन करणे, हा त्यापैकीच एक अधिकार आहे” असे देशाच्या सरन्यायाधीशांनी सांगितले.
“आम्ही जी समिती स्थापन करु, ती आमच्यासाठी असेल. तुम्हा सर्वांना ज्यांना समस्या सोडवायची आहे, ते त्या समितीकडे जाऊ शकतात. ही समिती कुठलाही आदेश देणार नाही तसेच शिक्षा करणार नाही, ही समिती फक्त आम्हाला अहवाल सादर करेल” असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
111 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
पसरणी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
अपघातात एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा |
बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे |
वडुथ येथे घरफोडी करून 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे |
गांजा शेती करणार्या फॉरेनर्सचा कारागृहात धुमाकूळ |
जिल्हयात एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन |
शिष्यवृत्तीचे महाडिबीटीवर जास्ती जास्त अर्ज भरुन घेण्याचे आवाहन |