कराड : कराड तालुक्यातील कालेटेक येथे बस थांब्याजवळच चोरटी दारू विक्री सुरू होती. याचा त्रास बस थांब्यावरील महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना होत होता. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव व महेश जाधव यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दारू विक्री रोखली. सहाय्यक पोलीस निरिक्षक बिराजदार यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
रघुनाथ किसन झेंडे व नारायण इंगवले अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान कालेटेक परिसरात अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात महिलांच्या तक्रारी वाढल्या असून याबाबत उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देणार असल्याचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांनी पत्रकाद्वारे सांगितले. कालेटेक येथील बस थांब्याजवळ महिला, शालेय मुलींसह प्रवाशी नेहमी थांबलेले असतात. याच परिसरात अवैध दारूचा अड्डा एका बंद पडलेल्या सलूनच्या दुकानात सुरू होता. याबाबत पोलीस पाटील विठ्ठल जाधव, महेश जाधव यांच्याकडे महिलांनी तक्रारी केल्या. पोलीस पाटील यांनी पोलीस अधिक्षक रणजीत पाटील,पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे यांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरिक्षक एस. आर. बिराजदार यांनी कालेटेक येथे छापा टाकला. पोलिसांनी विठ्ठल जाधव, महेश जाधव यांच्यासमक्ष दारूचा साठा हस्तगत केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |