08:44pm | May 25, 2023 |
सातारा : गुरुवार बागेच्या परिसरातील तख्ताचा वाडा येथे सतराव्या शतकातील ऐतिहासिक रांजण आढळून आला आहे. त्यामुळे नगरपालिकेने गुरुवार बाग परिसरातील समाज मंदिराचे काम तात्काळ थांबवावे, अशा स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत.
तख्ताचा वाडा परिसरातील ऐतिहासिक ठेवा वाचवण्याकरता या समाज मंदिराला परवानगी देण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सातार्यातील इतिहास प्रेमींनी तसेच माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व अरबाझ शेख यांनी दिला आहे. गुरुवार बाग परिसरामध्ये तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी तख्ताच्या वाड्याचे बांधकाम केले होते. हा परिसर तब्बल आठ एकर होता. पैकी साडेचार एकर वर आता विविध इमारतींचे अतिक्रमण झाले आहे. उरलेल्या साडेतीन एकरच्या जागेला वाचवण्यासाठी इतिहास प्रेमींची धडपड सुरू आहे. जिल्हा कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरबाज शेख यांना सदर वाड्याच्या जागेमध्ये नगरपालिकेने समाज मंदिराला परवानगी दिल्याचे समजले. या कामाला त्यांनी हरकत घेत याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले होते. तसेच त्यांनी या प्रकाराची कल्पना खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. उदयनराजेंनी तात्काळ गुरुवारी गुरुवार भाग येथील तख्ताच्या वाडा परिसराला भेट दिली यावेळी रवींद्र झुटिंग, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा विकास मंचचे निलेश पंडित, अरबाज शेख आदी उपस्थित होते.
या जागेची पाहणी करून खासदार उदयनराजे भोसले यांनी हे समाज मंदिराचे काम तात्काळ थांबवावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान येथे 17 व्या शतकातील एक ऐतिहासिक रांजण आढळून आला आहे. हा रांजण मातीमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आहे यावरूनच या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. असे असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी ही परवानगी दिलीच कशी, असा खडा सवाल सुहास राजेशिर्के यांनी केला आहे. शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनीसुद्धा या जागेची पाहणी केली. या रांजणावर संशोधन केल्यानंतर त्यांच्या अधिक तपशील उजेडात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र ऐतिहासिक तक्ताच्या वाडा परिसरात बांधकामांना परवानगी मिळते कशी? अशी खाजगी बांधकामे करून जर ऐतिहासिक ठेवा नष्ट केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शर्के यांनी दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |