09:48pm | Jul 01, 2020 |
सातारा : फलटण तालुक्यातील तरडफ येथे तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱया १३ जणांवर कारवाई करत सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक करुन फलटण पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी असा एकूण २ लाख ७० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना तरडफ येथे काही लोक पैसे पैज म्हणून लावून जुगार खेळत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. पाटील यांनी तपास पथकास त्या ठिकाणी जावून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने मिळालेल्या माहिती आधारे तरडफ येथे छापा टाकला. यावेळी 13 जण पत्यांवरती पैसे पैज म्हणून लावून जुगार खेळत होते.
या सर्व संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे २ लाख ७० हजार ८५० रुपये किंमतीची रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटार सायकल व जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाईसाठी या सर्व संशयितांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, जोतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक योगेश पोळ, राजकूमार ननावरे, केतन शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |