कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दि.१५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाघोली (ता. कोरेगाव) येथील रोहित पोपट शिंदे (वय २६) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या युवकाला वाघोली येथील काही युवक व नातेवाईक उपचारांसाठी पिंपोडे बुद्रुक येथील खासगी दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा त्याठिकाणी नातेवाईकांच्या जमावाने गोंधळ घातला. नंतर पुन्हा मृत युवकास घेऊन जमाव ग्रामीण रुग्णालयात गेला. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनीही त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडल्या, सॅनिटायझर मशीन फोडले, महिला प्रसूती गृहाच्या खोलीचा दरवाजा फोडला, तसेच दवाखान्यात प्रचंड गोंधळ घातला. रुग्ण सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांवरही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |