06:52pm | May 27, 2023 |
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणे विक्री केंद्रावर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकूण 12 भरारी पथकाची स्थापना केली असून या भरारी पथकांमार्फत सहा खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
शेतकर्यांची अडवणूक होऊ नये, त्यांना खते आणि बियाणे योग्य किंमतीत मिळावीत यासाठी जिल्ह्यात कृषि विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी एकूण 12 भरारी पथके तयार करण्यात आली असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमितता केल्याचे निर्दशनास आल्याने तसेच जादा दराने खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकर्यांना योग्य प्रकारे बिले न देणे, परवाना नूतनीकरण न करणे यामुळे जिल्ह्यातील 6 खत विक्रेते यांच्यावर भाग्यश्री फरांदे यांनी कारवाई केली आहे.
या तपासणीत दोषी आढळलेल्या 4 विक्री केंद्रावर परवाना निलंबनाची कारवाई आणि 2 खत विक्री केंद्राचा परवाना रद्दची कारवाई केली. यामध्ये वाई तालुक्यातील 3, सातारा तालुक्यातील 1 आणिपाटण तालुक्यातील 2 विक्रेत्यांचा समावेश आहे.
जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके खते, बियाणे व किटकनाशके दुकानांची अचानक तपासणी करतील तर, प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या भरारी पथकामध्ये कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग, वजन मापे निरिक्षक यांचे प्रतिनिधी आहेत, असेही श्रीमती फरांदे यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |