01:31pm | Mar 20, 2022 |
कराड : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई जिल्हा बँकप्रकरणी तक्रार झाली आहे. म्हणून त्यांना राग आला असल्याने ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. परंतु, त्यांच्यावरील कारवाईत महाविकास आघाडी सरकारची नक्कीच सूडाची भूमिका नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे सहकारातील काम मोठे आहे. त्यामुळे सहकार विभागाची माहिती घेताना जास्त डाटा बसण्यासाठी दरेकरांनी जास्त जीबी’चा पेनड्राईव्ह घ्यावा, असा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सातारा येथे सहकारी संस्थातील भ्रष्टाचारासंदर्भात वक्तव्य केली होती. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवार, दि. १९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ना. पाटील म्हणाले, मुंबई जिल्हा बँकेवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. मुंबई जिल्हा बँकेवर ते मजूर संस्थांतून निवडून येत होते. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आल्याने त्याची सहकार विभागाच्या वतीने चौकशी झाली. त्यामध्ये त्यांना मजूर म्हणून अपात्र जाहीर करण्यात आले आहे. दरेकर यांच्याबद्दल आम आदमी पार्टीच्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडे तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी मजूर या व्याखेत बसून अनेक वर्षे मुंबई जिल्हा बँकेवर काम केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
दरेकर यांनी विधान परिषदेला उभे राहताना प्रतिज्ञापत्रात व्यवसाय म्हणून स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची भूमिका नाही. मुळात त्यांनी मजूर या प्रवर्गात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा घडला असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे गृह विभाग आणि सहकार विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मार्केट कमिटी निवडणुकीचा बिगूल एप्रिलनंतर
सध्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरू असून काही सोसायटीच्या निवडणुका बाकी आहेत. विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपताच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वाजणार असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
सोसायटीमुळे तालुक्यात मोठी इर्षा निर्माण झाली
सोसायटीच्या निवडणुका पाहता सातारा जिल्ह्यात विशेषःत कराड तालुक्यात एकमेकांविरूध्द इर्षा निर्माण झाली आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून परिसरातील लोकांचा विकास होवू शकतो; शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना राबविता येतात. राज्यात मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याने आता राजकारण स्थानिक पातळीवर तापलेले पहायला मिळेल, असेही सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |