सातारा: पाचगणी व भिलार येथे दि.10 ते 14 फेब्रुवारी अखेर 45+ सिनिअर्स क्रिकेटपटूंची 20-20 क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स स्पोर्टस् असोसिएशन ऑफ ऑल स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामवंत संघासह गोव्याचा संघही स्पर्धेत सहभागी आहेत. नामांकित माजी रणजीपटूंसह दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधीचा लाभ क्रिकेटप्रेमींना घ्यावा, असे आवाहन आण्णा महाजनी व सुरेश साधले यांनी केले आहे.
यजमान सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, गोवा या संघांचा यात समावेश आहे. पाचगणी येथील संजीवन विद्यालय, भिलार येथील शिवाजी स्टेडीयमवर या स्पर्धेतील सामने खेळले जातील. संजीवनच्या 2 मैदानांवर टर्फ विकेट तर शिवाजी स्टेडीयमच्या मैदानावर अॅस्ट्रोटर्फ खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी रणजीपटू इक्बाल सिद्दिकी, प्रसाद कानडे, जयंत दळवी, अनंत नेरळकर, सचिन उपाध्ये तसेच गोवा संघातून 4 रणजीपटू या स्पर्धेत खेळणार आहेत. आर. सी. सी. स्पोर्टस् अॅकेडमी, सातारा वॉरीयर्स यांनी संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. सन 2013 पासून ही स्पर्धा सातत्याने सुरू असून यंदाचे हे आठवे वर्ष आहे. सन 2017 ते 19 या काळात सलग तीन वर्षे सातारा संघाने या स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर संघाने स्पर्धा जिंकली होती. 20-20 क्रिकेट लोकप्रियतेच्या शिखरावर असून या स्पर्धेतही ही चुरस आणि नामवंत खेळाडूंचा खेळ रसिकांना पाहता येईल.
शिवाय पाचगणी, भिलारसारख्या निसर्गाने नटलेल्या पर्यटनस्थळी होणारी स्पर्धा रंगतदार ठरेल. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून दर्जेदार मैदाने, खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. खेळाडूंची निवास व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी एम.सी.ए.चे पंच काम पाहणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने सातार्याचे माजी रणजीपटू अफजल पठाण, सुनील गाडेकर यांना गौरविण्यात येणार आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |