01:45pm | Sep 04, 2020 |
इस्लामाबाद: चीनच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तान विरोधात आता स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले आहेत. पाकिस्तान सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सुमारे 25 लाख मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान आता चीनच्या जाळ्यात अडकतच चालला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानचा पाय आणखीच खोलात जात आहे. पाकिस्तानने आपला समुद्रही चीनच्या ताब्यात दिल्याचे चित्र आहे. पाकिस्तानने विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी जहाजांना मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे कराचीतील मच्छिमारांना धक्का बसला आहे. हजारो मच्छिमारांनी चीनविरोधातही आंदोलन सुरू केले. पाकिस्तान सरकारने परवानगी दिल्यामुळे चीनहून खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी कराचीत मोठ्या 20 ट्रॉलर दाखल झाल्या आहेत. या चिनी जहाजांना सिंध आणि बलुचिस्तानच्या किनार्याजवळ मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चिनी जहाजांना पाकिस्तानमध्ये मासेमारी करू न देण्याची मागणी स्थानिक पाकिस्तानी मच्छिमारांनी केली आहे.
पाकिस्तानमध्ये जवळपास 25 लाखजणांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालतो. हे मच्छिमार छोट्या नौकांचाही वापर करतात आणि खोल समुद्रात जाऊ शकत नाहीत. याउलट चिनी जहाज हे खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणावर मासे पकडू शकतात.ेजगभरातील एक तृतीयांश सी-फूड चीनमध्ये खाल्ले जाते. त्यामुळेच आता चीनच्या समुद्र हद्दीत माशांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच चिनी जहाजे मासेमारी करण्यासाठी इतर ठिकाणी जात आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |