01:37pm | Mar 25, 2021 |
पुसेगाव: खटाव तालुक्यातील मांजरवाडी ते औध रस्त्याचे काम राजपथ इन्फ्राकॉन कंपनीकडे असून सदर रस्त्याचे काम दिड महिन्यापासून बंद असून ठेकेदाराचे पैसे संपल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे प्रवाशी व् नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालून या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा याभागातील त्रस्त ग्रामस्थ, रहिवाशांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मांजरवाडी ते औंध या रस्त्याचे काम मागील सुमारे दोन वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, गटर्स दुरूस्ती, पुल दुरुस्ती आदी कामे सुरू आहेत. मात्र मागील दीड महिन्यापासून औंध गावानजिकच्या पुसेगाव पूल ते नवीन बसस्थानक चौक त्याचबरोबर केदारलिंग मंदिरापर्यंतचा रस्ता खोदून ठेवल्याने व अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात घडू लागले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी दगडे मांडली आहेत. खडी उकलली आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर धूळही मोठ्या प्रमाणात उडत आहे. परिसरातील रस्त्यालगत असणार्या सुमारे दिडशे ते दोनशे कुटुंबांना धुळीचा व वायू प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत संबंधित ठेकेदार व कामगारांना वारंवार सांगूनही मागील एक महिन्यापासून कोणीही त्याकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे. याबाबत प्राप्त माहिती नुसार संबंधित ठेकेदाराची बिले अडकल्यामुळे हे काम रखडले असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र काम बंद पडल्याने धुळीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडू लागले आहेत. महिला, लहान मुले नागरिकांना ध्वनी, वायू प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा संबंधित ठेकेदार व अधिकारी वर्गाच्या कारभाराविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
या कंपनीतर्फे गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात सात हजार झाडे लावली होती. त्यातील बहुतांश झाडे पाणी न घातल्यामुळे जळाली होती. याबाबत आवाज उठवल्यामुळे पुन्हा त्याठिकाणी नविन झाडे लावली. पण कंपनीच्या दुर्लक्षामुळे व दीड महिन्यापासून काम बंद असल्यामुळे कामगार कामावर नसल्यामुळे झाडांना पाणी कोण घालणार, यामुळे पुन्हा झाडे जळू लागली आहेत. याबाबत वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |