11:27pm | Jun 23, 2020 |
फलटण : महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा घेवून गेली अनेक शतके अव्याहतपणे सुरु असलेली संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा (वारी) सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. असे असले तरी फलटणमध्ये मात्र वारीच्या आगमनाच्या प्रित्यर्थ येथील विमानतळावर समाज आरती करुन वारीचा प्रतिकात्मक सोहळा पार पडला.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी येथून पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी दरवर्षी जात असते. या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकही लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. गेली शेकडो वर्षे हा वैष्णवांचा मेळा ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता आळंदी ते पंढरपूर असा शेकडो किलोमीटरचा पल्ला पायी चालूनच गाठतात. यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा सोहळा रद्द करण्यात आला. केवळ 50 जणांच्या उपस्थितीतच या वारीला शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे शेकडो वर्षांची वारी परंपरा खंडित झाली. दि. 13 जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आळंदीतून प्रयाण केले. दरवर्षीप्रमाणे मजल-दरमजल करीत फलटणमध्ये पोहोचणारी वारी आज तारखेप्रमाणे पोहोचली असती. त्यामुळे फलटणमधील भाविकांनी येथील विमानतळावर सोशल डिस्टन्सचे पालन करीत समाज आरती घेतली. यावेळी श्री विठ्ठलासह ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करण्यात आला. तसेच उपस्थितांना यावेळी प्रसादाचेही वाटप करण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |