03:06pm | Jun 04, 2020 |
सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात बागायतदारांचा व तालेवारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्ह्यातील रस्त्यांची दैना झालेली आहे. दळणवळणाची साधने असूनही केवळ रस्ते चांगले नसल्याने सातारा जिल्ह्यातील शेतमालासह उद्योगधंद्यांनाही आता मर्यादा येवू लागल्या आहेत. रस्त्यांसाठी निधी नसला तरी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांच्या निवासस्थानांना मात्र पुरुषभर उंचीची संरक्षक भिंत बांधून लाखोंची दौलतजदा केल्यामुळे सातारा जिल्ह्यात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा शहरातील सदर बझारमधील जुना आरटीओ परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांची निवासस्थाने आहेत. पूर्वी याठिकाणी सागवानासह शेकडो झाडे असल्यामुळे या झाडांमधून त्यांच्या निवासस्थानांचे दर्शन होत नसायचे. त्यामुळे इथे नक्की कोण राहते? असा प्रश्न अनेकांना पडायचा. सा. बां. विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता माने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर ‘राजभोज’ नावाचा नवीन कारभारी आला. जिल्ह्यात पाय ठेवतो न ठेवतो तोच त्यांनी शासकीय निवासस्थांनांचे नूतनीकरण करण्याचे आदेश सोडले. परंतू यामध्येही त्यांचे समाधान न झाल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून कमविलेला पैसा सातार्यात सुरक्षित कसा राहील? याची चिंता त्यांना सतावत असल्याने त्यांनी लागलीच जुना आरटीओ परिसरातील सा. बां. विभाग अधिकारी-कर्मचारी निवासस्थान तसेच जुने ब्रिटीशकालीन सर्किट हाऊस असलेल्या या जागेला सभोवताली पुरुषभर उंचीचे कुंपण घालण्याच्या निविदा काढण्यात आल्या. संबंधित ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यानंतर या कामाला मंजुरी मिळाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या परिसरात शेकडो झाडे होती. ती काही दिवसांतच जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे हा परिसर उघडा-बोडका दिसू लागला. वास्तविक याठिकाणी जुने सिमेंट विटांचे कुंपण होते. सर्वकाही व्यवस्थित असताना पुन्हा याठिकाणी 7-8 फुट उंचीचे कुंपण कशासाठी घातले जात आहे, असा प्रश्न खुद्द बांधकाम विभागातील कर्मचार्यांना पडला. पण राजाला सल्ला कोणी द्यायचा? यामुळे याबाबत कोणीही चकार शब्द उच्चारला नाही.
सुमारे दोन एकरात असलेल्या या शासकीय जागेचा ‘राजभोज’ यांनी बैलाने लघुशंका करावी, अशी कुंपणे घालून पूर्ण जागाच आटवून टाकली. वास्तविक जेवढ्याची निविदा काढण्यात आली आहे, त्यापेक्षा कैकपटीने वाढीव खर्च याठिकाणी करण्यात आला आहे. संबंधित कुंपण किमान चारवेळा बांधून ते किमान चारवेळा पाडण्यात आले. त्यामुळे तो निविदाबाह्य खर्च नक्की कोणाच्या खिशातून करण्यात आला? याचेही उत्तर आता ‘राजभोज’ यांना द्यावे लागणार आहे. डिसेंबरमध्ये सुरु झालेले काम फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत युद्धपातळीवर सुरु होते. परंतू मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हे काम थांबविण्यात आले होते. परंतू गेल्या महिन्यात सातारा जिल्हाधिकार्यांनी बांधकामास सशर्त परवानगी दिल्यानंतर हे काम पुन्हा एकदा युद्धपातळीवर सुरु करण्यात आलेले आहे. कुंपणाचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाल्याने बाहेरच्या माणसाला आत डोकावणेही मुश्किल होणार आहे. कुंपणाच्या मध्यभागीच शासकीय विश्रामगृह असल्याने तेथे जाणार्याला सरळ जाता येणार नसून त्यांना वाकडी वाट करावी लागणार आहे. संपूर्ण जिल्हा खड्ड्यात घालून सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुकूटमणी राजभोजांनी ही नसती उठाठेव करीत शासनाचा पैसा पाण्यात घालवला आहे.
दहा टक्क्यांतून आयुष्यभर कमविलेला पैसा किमान सातार्यात तरी सुरक्षित रहावा, यासाठी पाकिस्तान भारताच्या सीमेवर असणार्या वाघा बॉर्डरला लाजवतील अशी संरक्षक भिंत याठिकाणी सा. बां. विभागाकडून उभारण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात वाघा बॉर्डरची दिव्यता पाहण्यापेक्षा सातारकरांनी सा. बां. विभागाच्या कुंपणाची भव्यता पहावी. त्यावेळी सामान्य सातारकरांची तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्याधिकारी, मुख्य सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या कुंपणांची सध्या दुरवस्था झालेली आहे. संरक्षणाच्यादृष्टीने खरेतर त्यांच्या निवासस्थानांची कुंपणे पुरुषभर उंचीची असावीत. परंतू तसे न होता जिल्हाभर भिकेचा कटोरा हातात घेवून टक्केवारी मागणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी एवढे मोठे कुंपण कशासाठी उभे केले आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही.
स्ट्रक्चरल ऑडिट करावेच लागणार !
जुना आरटीओ परिसरातील सा.बां. विभागाच्या अधिकार्यांनी स्वत:च्या निवासस्थानाभोवती उभे केलेल्या कुंपणाची निविदा रक्कम तसेच एकूण झालेले बांधकाम हे तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरच सा.बां. विभागाच्या अधिकार्यांनी केलेला लाखोंचा घोटाळा बाहेर पडणार आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर निविदाबाह्य काम करण्यात आलेले आहे. यासाठी लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सातार्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
...तर ‘राजभोज’ला कार्यालयात जाऊन ठोकणार !
साधारण वर्षभरापूर्वी लोणंद - वाठार स्टेशन दरम्यान निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरुन दुचाकीवरुन प्रवास करणार्या एका दाम्पत्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता, तर पती हा कायमस्वरुपी जायबंदी झालेला आहे. त्यामुळे त्या दाम्पत्याच्या मुलांनी याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. परंतू वर्ष उलटूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने अद्याप संबंधित अधिकारी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्या दाम्पत्याच्या मुलाला जुना आरटीओ परिसरातील सा.बां. विभागाच्या अधिकार्यांच्या घराला घालत असलेल्या कुंपणाबद्दल माहिती पडले असता हेच पैसे जर अधिकार्यांनी निकृष्ठ दर्जाचा रस्ता दुरस्त करण्यासाठी वापरले असते तर कदाचित माझ्या आईचा जीव वाचला असता, तसेच वडीलही जायबंदी झाले नसते. त्यामुळे आता फैसला करण्याची वेळ आली असून सरकारी खर्चाने सोन्याचा पिंजरा बनविणार्या ‘राजभोज’ ला आता कार्यालयात जाऊनच ठोकणार असल्याचा इशारा नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर संबंधिताने ‘सातारा टुडे’शी बोलताना दिला आहे.
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |