अजित जगताप
सातारा: सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी वैचारिक प्रेरणास्थान असते. याठिकाणी एका निश्चित भूमिकेचा प्रसार व निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण केले जातात. परंतु सातारा जिल्ह्यातील मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दुष्काळी माण तालुक्यात गोंदवले या ठिकाणी सातारा मनसे कार्यालयाची निर्मिती केली असून हे कार्यालय म्हणजे भाविकांसाठी प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदवले नगरीत देशी विदेशी पर्यटक भेट देतात. तसेच ग्रामीण भागातून भाविक पायी प्रवास करून श्रीच्या समाधीचे दर्शन घेतात.अशा वेळी गोंदवले ते पिंगळी रस्त्यावरील आलिशान मनसे कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे कारण म्हणजे या कार्यालयाला भेट दिल्यानंतर मन शांती तसेच गारवा मनाला समाधान मिळवून देते. दहा गुंठे क्षेत्रामधील मनसे कार्यालय हे भाविकांसाठी विश्रांतीसाठी स्थळ बनले आहे.
लहान मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धासाठी आसान व्यवस्था व तरुणांसाठी व्यायाम शाळा अशी एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. भाविकांची विचारपूस, थंड पाणी, तसेच त्यांना प्रवासाबाबत मदत केली जाते. याठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे राजकीय चर्चा टाळून सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पाच वर्षापूर्वी दुष्काळने होरपळलेल्या जनता व जनावरांना दिलासा देण्यासाठी गोंदवले येथे चारा छावणी उभी करून मनसे मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांचा माण तालुक्यात दौरा केला होता. सध्याच्या कोरोना महामारी मध्ये माण आणि खटाव तालुक्यातील गोर गरिबांना सरसकट जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप केले आहे
त्याचप्रमाणें शेतकर्यांवर अन्याय करणार्या काही पवनचक्क्या विरोधात आंदोलन करून प्रशासनाला व महसूल विभागाला या आंदोलनामुळे लक्ष घालावे लागले. सध्या अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी गाव पातळीवरील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक ते जिल्हाधिकारी पर्यंत पाठपुरावा करीत आहेत.
गोंदवले याठिकाणी मनसे कार्यलय हे खर्या अर्थाने पर्यटकांना आकर्षक करीत आहेत त्याचबरोबर याठिकाणी भविष्यात संपर्क यंत्रणा, वाचनालय, तसेच प्रवासासाठी आरक्षित केंद्र उभारण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हयातील सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |