03:15pm | Nov 21, 2020 |
अजित जगताप
सातारा : छत्रपती शिवरायांनी कड्याकपाऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर स्व यशवंतराव चव्हाण यांनी कलश आणून पूजा केली होती. त्याच महाराष्ट्रात साडेतीनशे वर्षानंतर प्रथमच मराठा बांधव एकत्र आले. त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी ऐतिहासिक मोर्चे काढले. दुर्दैवाने राजकीय पक्षाने त्यात सहभागी होऊन राजकारणाची पेरणी केली. त्यामुळे आजही मराठा बांधव हक्कासाठी वंचित राहिले आहेत. असे असताना राजकीय पक्षांनी 'एक मराठा लाख मराठा' या तत्त्वाला तिलांजली देऊन मराठा समाजमध्येच राजकीय झुंज लावली आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण पिढी नाराजी व्यक्त करीत आहे.
सर्वसामान्य मराठा बांधव हा 'एक मराठा लाख मराठा' नारा देऊन यशाची स्वप्ने पाहत आहेत. आजच्या घडीला पदवीधर व शिक्षक मराठा मतदार विचलित झालेला आहे. कोणता झेंडा घेऊ हाती? अशी अवस्था झाली आहे. खेड्या पाड्यातून आपल्या समाज्याच्या न्याय हक्कासाठी 'एक मराठा लाख मराठा' जयघोष करून एक पिढी रस्त्यावर उतरली. तर बी. सी, ओ.बी.सी. अल्पसंख्याक बांधवांनी जाहीर पाठींबा देऊन त्यांनी मराठा समाज्यातील मित्रांची नैतिक ताकद
वाढवली होती.. याचा विसर राजकीय नेत्यांना झाला असल्याचे या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीच्या माध्यमातून अनपेक्षित मराठा मतदारांमध्ये विभागणी झाली आहे. आज नाती- गोती, भागवारी पाहवून मते मागितली जात आहेत. तर काही अपक्ष उमेदवार हे जातीच्या आधारे मत मागत असताना मराठा समाजाचा उमेदवार संकोचिंत वृत्तीने जात म्हणून मते मागत नाही. हे परिवर्तन म्हणायचे का ? अशी विचारणा विचारवंत करू लागले आहेत. जावळी तालुक्यात सर्वसाधारण महिला जागेवर मराठा महिला उमेदवाराचा पराभव करून इतर महिलांना निवडून देण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे आज पुन्हा एकदा दुसऱ्या मराठा उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत. हे राजकारणात चालत असले तरी सर्व सामन्यांना खटकू लागले आहे. जात म्हणून सातत्याने भूमिका बदलणे उचित नाही असा अनेकदा सूर उमटत असतात.पण, या निवडणुकीत हा मुद्दा जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आला आहे असा सूर उमटले आहेत.
शिक्षक व पदवीधर मतदार संघामध्ये सर्वानुमते एक मराठा उमेदवार दिला असता तर कदाचित बिनविरोध निवडणूक झाली असती मात्र राजकीय पक्षांना ते नको आहे हेच यातून सिद्ध झालेले आहे. मराठा युवक स्व कर्तबगारी वर स्वतःला सिद्ध करू शकतो त्यासाठी त्याना आरक्षणाची गरजच आहे याबद्दल राजकीय नेते सोडता कुणाचेही दुमत नाही असं आता धाडसाने नमूद करावे अस वाटत आहे. पूर्वी '''मराठा तितका मिळवावा अवघा धर्म वाढवावा''' असे संतांनी सांगितले. पण सध्या राजकारणी मंडळी ''''मराठा तितका मिळवावा, आवडेल तिथे लोळवावा'' अशी धोरणे राबविण्यात आली. त्याचा निषेध केला जात आहे.
पदवीधरांनी एका बाजूला 'पकोडा' तयार करायचा का दुसऱ्या बाजूला घराणेशाहीत जन्मलेल्या पाळण्यातील बाळाचे नेतृत्व स्वीकारायचे का असा ?मार्मिक सवाल मतदार करू लागलेले आहेत. लाकडाच्या मोळीची एकीची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ही मोळी विस्कटली तर सहजरित्या लाकूड मोडता येत अशा पद्धतीने सक्षम उमेदवाराचा पराभव झाला तर त्याला जबाबदार कोण अशी शंका आतापासूनच उपस्थित केली जात आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |