सातारा : मालोजीनगर (ता. फलटण) येथील महिलेला जातीवाचक वागणूक दिल्याबद्दल आणि फसवणूक केल्याबद्दल साताऱ्यातल्या डॉक्टर दाम्पत्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने १ वर्षाचा कारावास व ५ हजाराचा दंड, दंड न दिल्यास १ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फलटण शहर पोलीस ठाण्यात डॉ. प्रशांत चंद्रकांत काळे, डॉ. तनुजा प्रशांत काळे (दोघे रा. पोवई नाका सातारा) यांच्याविरुद्ध श्रीमती सरोजिनी अविनाश शिंदे (वय ३५, रा. मालोजीनगर फलटण) हिने फिर्याद दाखल केली होती. बांधण्यात येणाऱ्या सत्य रेसिडनसी अपार्टमेन्टमध्ये कराराप्रमाणे व नोटरीप्रमाणे श्रीमती शिंदे यांच्या वाट्याला येणारे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील प्रत्येकी एक प्लॅट व ४० टक्के पार्किंग जागा व ३ केले. लाख रुपये न देता फसवणूक केली. २०१४ मध्ये श्रीमती शिंदे यांना त्यांच्या पतीसमोर डॉ. प्रशांत काळे याने तुम्ही पारध्यांनो तुम्हाला काय करायचं ते करा, चोऱ्यामाऱ्या करून पालात रहायचं सोडून बंगल्यात राहायला येताय का, तुम्हाला बांधकाम करू देत नाही, म्हणून जातीवाचक शिवीगाळ दमदाटी केली. याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. याचा तपास फलटणचे तत्कालीन डी. वाय. एस. पी. राहुल माकनिकर यांनी करून न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले होते.
हा खटला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कोर्टात चालला होता. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एल. के. खाडे यांनी कामकाज पाहिले. ७ साक्षीदार तपासले.
परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीवरून तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपींना १ वर्ष कारावास व ५ हजार दंड, दंड न दिल्यास १ महिन्याची सक्तमजुरी शिक्षा सुनावली. फलटणचे डीवायएसपी तानाजी बरडे, फलटणचे पोलीस निरीक्षक दादाराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी काम पाहिले.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |