09:43pm | Jan 25, 2022 |
सातारा : स्वतंत्र भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना साताऱ्यात वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. अशा आंदोलनाची असंख्य इशारा पत्रे जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली असून पोलीस यंत्रणेला याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
युवा राज्य फाऊंडेशनचे राज्याध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी तब्बल नऊ विषयावर आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या विषयांची मोठी जंत्री आहे. सातारा येथील जम्बो हॉस्पिटलची इमारत अद्यापही पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित झाली नाही, हॉटेल प्रीती आणि गोडोली येथील हॉटेल लेक व्ह्यू या दोन हॉटेलमध्ये कोरोना बाधित कर्मचारी असतानाही या हॉटेल सेवा सुरू आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या अभ्यास दौर्याच्या खर्च प्रकरणाची चौकशी व्हावी, यांसह इतर सहा विषयांचे तक्रार अर्ज तिकुंडे यांनी प्रशासनाकडे दाखल केले होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
जकातवाडी येथील गट नंबर कार्यक्रमात परस्पर फेरफार करून वैयक्तिक लाभासाठी शासन नियमांची मोडतोड केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक खरेदी-विक्री यांना निलंबित करावे, असा तक्रार अर्ज रिपाईचे आक्रमक नेते किशोर गालफाडे यांनी केला होता. या प्रकरणावर कारवाई न झाल्यास प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाला सतर्क रहावे लागणार आहे.
विठ्ठल मारुती भोसले आंबवडे, तालुका खटाव यांनी संजीवनी पतसंस्था व जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांनी संगनमताने त्यांची जमीन परस्पर ताब्यात घेऊन त्याची विक्री केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन आणि तक्रार दाखल केली होती. लिलाव व विक्री या अयोग्य पद्धतीने केल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे आपणास भूमिहीन होण्याची वेळ आल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. याशिवाय दिशा विकास मंचचे जिल्हाध्यक्ष सुशांत मोरे यांनी 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेकडून ग्रामसभा घेण्याचे आधी सूचना सात दिवस आधी देणे अपेक्षित होते. मात्र या मार्गदर्शक सूचना आदल्या दिवशी देण्यात आल्या होत्या. या विषयावरून त्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. साताऱ्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी मंगळवार पेठेतील चिमणपुरा पेठेतील एका सदनिकेची दुमजली बांधकाम बेकायदेशीररित्या झाले आहे, असे असताना सातारा पालिकेचे भाग निरीक्षक बोटचेपेपणाची भूमिका घेतात अशी अमित शिंदे यांची तक्रार आहे. त्यांनी सुद्धा प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्याने बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनांची गर्दी होणार आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार असून या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय येऊ नये याकरिता पोलिस यंत्रणा आत्तापासूनच अलर्ट झाली आहे.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |