(प्रकाश राजेघाटगे)
बुध: महाराष्ट्रासह देशात करोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेला थोपवण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. रुग्णांची वाढती संख्या, वैद्यकिय सुविधांचा अभाव, औषधांचा तुतवडा, झपाट्याने वाढणारी रूग्ण संख्या यावर कहर म्हणजे जनतेने सरकार बरोबर पुकारलेला असहकार! या सर्वांचा परिणाम करोना वाढीवर होताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला. या लॉकडाऊन मधुन अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लावण्यात आले. पण हे निर्बंध लावताना सरकार संभ्रमात दिसले. प्रथम तर लोकडाऊन लावायचा की नाही लावायचा? लावायचा तर किती दिवसांचा लावावा? कोण कोणत्या घटकांना लॉकडाऊन मधून वगळावे? सर्वात महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन घेवून जनतेत नाराजी पसरू कशी द्यायची नाही? या सर्वांबाबत शासन पातळीवरच मोठा संभ्रम निर्माण झालेला पहायला मिळाला.
उदाहरणच द्यायचे झाले तर केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणार्या कर्मचार्यांसाठी सार्वजनिक वाहतुक जसे ट्रेन, बस सेवा चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच वेळेस सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मज्जाव घालण्याचे आदेश संबंधितांना देण्यात न आल्यामुळे काल पहिल्या दिवशी लोकल सेवा तसेच बस सेवेचा वापर जनतेने केला.
भाजीपाला बाजार सुरू ठेवण्यात आल्यामुळे बाजारात जनतेचा मुक्तसंचार पहावयास मिळाला, महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये रिक्शा वाहतुक सुरू असलेली पहायला मिळाली. परिणाम कडक निर्बंधांचा फज्जा उडालेला पाहणे सरकारच्या नशिबी आले. अत्यावश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले पण जनता कोणत्या भ्रमात आहे तेच कळायला मार्ग नाही.
निर्बंधांना घेवून सरकार संभ्रमात आणि जनता भ्रमात असेल तर या करोनाच्या महामारीला रोखायचे कसे? ह्या प्रश्नाचे उत्तर लवकर शोधावेच लागेल.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |