08:31pm | May 12, 2022 |
सातारा : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाच दरोडेखोर औंध पोलिस स्टेशनचे लॉकअप सोडून पळाले होते. या प्रकरणातली कर्तव्य कसूरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना भोवली आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी निलंबित केले आहे. या थेट कारवाईमुळे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक 9 मे रोजी पहाटे औंध पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पाच दरोडेखोर पळाले होते. या घटनेमुळे सातारा जिल्ह्याच्या पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आपला तपास गतिमान करत त्यातील तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार संतोष कोळी, हवालदार कुंडलिक कटरे, हवालदार नारायणी व हवालदार गलांडे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
गृहमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या ढिलाईमुळे संबंधित दरोडेखोर कोठडी तोडून पळाले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या पाचही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याचा अहवाल लवकरच अजयकुमार बन्सल यांना सादर केला जाणार आहे. पोलीस ठाण्याचा कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या कारवाई नंतर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलिस चाणाक्षपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |