08:04pm | Jun 04, 2021 |
वाई : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारीच सहभागी न झाल्याने पून्हा सभा तहकूब करण्याची नामुष्की आज सभागृहावर आली. मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांच्या समन्वयाअभावी आजची सभा दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आली यामुळे अनेक शहर विकासाची कामे अनेक दिवस प्रलंबित राहणार आहेत.
नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० एप्रिल रोजी तहकूब झालेली ऑनलाईन सर्वसाधारण सभा आज सकाळी ११ वाजता पुन्हा बोलाविण्यात आली होती. त्यावेळीही ही सभा योग्य समन्वयाअभावी तहकूब ठेवण्यात आली होती. या सभेच्या विषयपत्रिकेत एकूण २१ विषय होते. त्यामध्ये शहराच्या विविध भागात रस्ते, गटार व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याबाबत सुमारे अडीच कोटीच्या विकास कामांच्या निविदाना मंजुरी देण्याचा तसेच दलित वस्ती सुधार योजनेची काही कामे चर्चेला होती. पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती व जिल्हा नगरोत्थान, वैशिठयपूर्ण दलितेतर योजनांच्या कामांची निविदा व प्रशासकीय औपचारिकता पूर्ण होऊनही दप्तर दिरंगाईमुळे अडकून पडलेल्या कामाच्या विषयावर चर्चा होणार होती. या सभेसाठी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांसह कार्यालय अधीक्षक वेळेत ऑनलाइन सहभागी झाले होते. मात्र मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ या कार्यालयात हजर असुनही सहभागी झाल्या नाहीत. २० ते २५ मिनिटे वाट पाहिल्यानंतरही मुख्याधिकारी सहभागी न झाल्याने उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी सभा तहकूब ठेवण्याची सूचना केली. त्यास अन्य सदस्यांनी मान्यता दिली. त्यामुळे सदर सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांनी केली. दरम्यान पालिका कार्यालयात हजर असताना मुख्याधिकारी ऑनलाइन सभेत सहभागी न झाल्याने त्यांनी सभागृहाचा अवमान केल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मागील काही सभाचा आढावा घेतला असता मुख्याधिकारी जाणीवपूर्वक ऑनलाइन सभेत उशिरा सहभागी होत असल्याचे दिसून आल्याने त्यांना वेळेत सहभागी होण्याची विनंती नगराध्यक्षा आणि आपण केली होती. तरीसुद्धा त्या वेळेत हजर होत नाहीत, असे उपाध्यक्ष सावंत यांनी सागितले. याबाबत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी आजच्या बैठकीला उपस्थित होते. त्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासूनच पालिका कार्यालयात हजर होते. सभा सुरू झाली तेव्हा सर्व सदस्य ऑनलाईन दिसत होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे मी त्यांना दिसत नसल्यामुळे गैरसमजातून त्यांनी सभा तहकूब केल्याचे मला समजले, असे मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी स्पष्ट केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |