08:29pm | Apr 14, 2021 |
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच आजच्या घडीला सक्षम राष्ट्र बनविण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भोगावकर बोलत होते.
भोगावकर म्हणाले, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा सातार्याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरतंन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरु शकतात. त्यांनी शिकवलेल्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, हा विचार आजही तरुणपिढीला स्फूर्तीदायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनेच आजची तरुण पिढी शिक्षणाकडे वळताना दिसत आहे. त्यांच्या विचारांची कास धरुन तरुणांनी भविष्यासाठी मार्गक्रमण करावे.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदिप जगताप, उत्तमराव सावंत, महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, ऍड. इम्तियाज खान, ऍड. विकास साबळे, आसिफ पठाण, प्रा. चव्हाण, अतुल भोसले, विशाल कोळी, कुलदीप भोगावकर, प्रिया तोरस्कर, दिपेंती चिकणे, शिवाजी जाधव, ऍड. मंगेश महामुलकर, ऍड. भिसे, बापू सोरटे, संजय पवार, संदीप माने, डॉ. मधुकर माने, ऍड. विजय खामकर, संजय भोसले, सुनिल शिंदे यांची उपस्थिती होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |