08:21pm | Jan 15, 2021 |
सातारा : शाहुपूरी पोलिस ठाण्याची नूतन इमारत प्रशस्त व सोयीनियुक्त आहे. अत्याधुनिक बॉक्सिंग रिंगमुळे आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. ओपन जीममुळे पोलिस दलातील जवान आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. सातारा पोलिस दलाचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
गुरूवार दि.14 जानेवारी रोजी सातारा क्रिडा प्रबोधिनीच्या नवीन बॉक्सींग रिंग, ओपन जीम तसेच शाहुपूरी पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सातारा पोलीस क्रिडा प्रबोधिनीच्या नवीन बॉक्सींग रिंग, ओपन जीम उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, अत्याधुनिक बॉक्सींग रिंगमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होवून सातारा जिल्हा पोलीस दलाचा लावलौकीक होईल. तसेच ओपन जीममुळे पोलीस दलातील जवान व नागरिक उत्तम प्रकारे व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली असून त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिल. नव्याने स्थलांतरीत झालेल्या शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या नुतन इमारत प्रशस्त व सर्व सोयीनियुक्त आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे अभिनंदन केले.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रितू खोकर, पोलिस उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, शाहुपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सातारा शहर पोलीस ठाणे व सर्व पोलीस अंमलदार हे उपस्थित होते.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |