पुसेगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री. सेवागिरी विद्यालय पुसेगाव येथे, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व स्कूल कमिटीचे सदस्य श्री. बाळासाहेब जाधव, स्कूल कमिटी सदस्य मोहन तात्या जाधव, संतोष जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जाधव बी.डी, पर्यवेक्षक घाटगे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.घाटगे यांनी केले यामध्ये त्यांनी शाळेचा इतिहास सांगत असताना शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा व प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक मनोगत व्यक्त करताना मोहिते आर.एस. यांनी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान व त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब जाधव यांनी रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध उच्चपदावर कार्यरत आहेत, व आपले मोलाचे योगदान देत आहेत. असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच आपली कन्या कु.रचना जाधव हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एन.टी.एस.ई या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके विद्यालयास भेट दिली.
22 सप्टेंबर रोजी प्रत्येक वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे घोषित केले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू असेल असे सांगण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव बी. डी. यांनी सांगितले की कर्मवीर अण्णा यांचा वारसा सर्व शिक्षकांनी पुढे चालू ठेवावा व आदर्श विद्यार्थी घडवावेत. शेवटी विद्यालयातील उपशिक्षक काळे एच.एच. यांनी आभार व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |