02:59pm | Aug 12, 2020 |
सातारा : सिध्देश्वर कुरोली, ता. खटाव येथील ज्या युवकाला बाल गुन्हेगार न्यायालयातून जामीन मिळाला आहे. त्या संकेत आलेश काळे याला वडूज व पुसेगाव पोलिसांनी मोक्कातील फरारी आरोपी म्हणून अटक केली आहे. त्या युवकावरील ही कारवाई चुकीची असून याबाबत चौकशी करुन त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी एसपी तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, आपल्या नेतृत्वाखाली सातारा पोलीस दलाचे काम चांगले सुरु आहे. तर दलातील काही अधिकारी देखील चांगले काम करत आहेत. मात्र खटावचे उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्कातील फरारी आरोपी म्हणून संकेत काळे या अल्पवयीन युवकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व त्यांच्या सहकाऱयांनी संकेत काळे याला रस्त्यावरुन उचलून आणून जावेद अनिल काळे या आरोपीबरोबर त्याचे नाव जोडले व त्याला अटक केली आहे.
वास्तविक संकेत काळे हा बालगुन्हेगार असून गेल्या वर्षी त्याची बालगुन्हेगार न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. त्यावेळी त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता व आहे. आमची संघटना कोणत्याही गुन्हेगारांचे समर्थन करत नाही. मात्र, संकेत काळे याच्यावर झालेली कारवाई चुकीचे आहे. त्याबाबत चौकशी करुन संकेत काळेवर नसताना टाकलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांना देण्याची मागणी चव्हाण व संकेत काळेची आई हेलन आलेश काळे यांनी केली आहे.
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |