03:20pm | Dec 05, 2021 |
मुंबई : न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलन भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेत विश्वविक्रम केला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. पण, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. एजाझच्या या कामगिरीचे साऱ्यांनीच कौतुक केले. हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. एजाझच्या कामगिरीचे त्यांनीही ट्विट करून कौतुक केले.
जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर ही कामगिरी करणारा एजाज पटेल तिसरा गोलंदाज ठरला आहे. जिम लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या एका डावात 10 बळी घेतले होते. त्यानंतर भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 फलंदाजांना बाद केले होते.
एजाझने ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची डावातील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी १९७१मध्ये जॅक नॉरेगा (वेस्ट इंडीज) यांनी ९५ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ फ्रेड ट्रूमन (८- ३१, १९५२), लान्स गिब्स (८-३८, १९६२) व नॅथन लियॉन (८-५०, २००७) यांचा क्रमांक येतो. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील एजाझची ही कामगिरी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी हा विक्रम जॉर्ज लोहमन यांनी १८९६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रिचर्ड हेडली ( ९-५२ वि. ऑस्ट्रेलिया, १८९५), मुथय्या मुरलीधरन ( ९-६५ वि. इंग्लंड, १९९८) व सर्फराज नवाझ ( ९-८६ वि. ऑस्ट्रेलिया, १९७९) यांचा क्रमांक येतो.
विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या एजाझचे पवारांनी कौतुक केले. त्यांनी ट्विट केले की, कसोटीत एकाच डावात दहा विकेट्स घेण्याची अविश्वसनीय कामगिरी केल्याबद्दल एजाझ पटेलचे अभिनंदन. त्याचा जन्म मुंबईचा आणि तो आता न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतोय. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसराच गोलंदाज आहे.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |