11:14pm | Sep 20, 2020 |
सातारा : जिल्ह्यात उच्चांकी 38 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 732 जण बाधित निष्पन्न झाले आहेत. तसेच 384 जणांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
रविवारी जिल्ह्यात मृत्यूचे तांडव जणू घडले. जिल्ह्यात एकाच दिवशी उच्चांकी 38 बाधितांचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 866 वर पोहोचली आहे. तर 732 जण बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजार 824 वर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 384 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 20 हजारांचा आकडा पार करीत 20 हजार 250 वर पोहोचली आहे. रविवारी 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
38 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा तसेच विविध खाजगी रुग्णालयात 38 कोरेाना बाधितांचा मृत्यू झाला असून ते पुढीलप्रमाणे -
*सातारा तालुका-* शळकेवाडी येथील 65 वषी्रय महिला, गुजर आळी सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, वडुथ येथील 52 वर्षीय महिला, पंताचा गोट येथील 58 वर्षीय महिला, केसरकर पेठ सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, शाहूनगर गोडोली सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील 62 वर्षीय महिला, वळसे येथील 45 वर्षीय पुरुष, सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, संगममाहूली येथील 64 वर्षीय पुरुष.
*कराड तालुका-* पेरले येथील 75 वर्षीय पुरुष, कसुर येथील 68 वर्षीय पुरुष, विंग येथील 65 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 69 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 56 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 58 वर्षीय पुरुष, साळशिरंबे येथील 55 वर्षीय महिला, आणे येथील 77 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 70 वर्षीय पुरुष, कराड येथील 40 वर्षीय महिला, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, पाल येथील 75 वर्षीय पुरुष.
*वाई तालुका-* विरमाडे येथील 65 वर्षीय पुरुष, धर्मपूरी वाई येथील 32 वर्षीय पुरुष.
*खटाव तालुका-* काळेवाडी डिस्कळ ता. खटाव येथील 83 वर्षीय पुरुष.
*कोरेगाव तालुका-* तांदुळवाडी पाल येथील 70 वर्षीय पुरुष.
*खंडाळा तालुका-* खंडाळा येथील 85 वर्षीय महिला, वाठार कॉलनी खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष, जावळे येथील 85 वर्षीय महिला, घाटदरे येथील 68 वर्षीय महिला, बावडा खंडाळा येथील 64 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, भाडवडे येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 53 वर्षीय पुरुष.
*माण तालुका-* गोंदवले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष.
*सांगली जिल्हा* -कडेगाव येथील70 वर्षीय पुरुष.
269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15, खंडाळा 64, पानमळेवाडी 74, मायणी 66, महाबळेश्वर 50, असे एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |