12:57am | Aug 03, 2020 |
सातारा : रविवारी रात्री उशिरा 163 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनातून खडखडीत बरे झालेल्या 44 नागरिकांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
रविवारी दिवसभरात 163 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4430 वर पोहोचली आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील 163 कोरोनाबाधितांचा विस्तृत तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. हा तपशील उद्या जाहीर करणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. तिघांच्या मृत्यूमुळे कोरोनाबळींची संख्याही 139 वर पोहोचली आहे. रविवारी दुपारी जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 44 जण कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्तांचा तपशील पुढीलप्रमाणे -
खंडाळा तालुक्यातील कबुलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29, 31, 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 7 वर्षीय बालिका, तळेकरवस्ती 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 1 वर्षाचा बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर येथील 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला, 8 वर्षाची बालिका, शेळकेवाडी येथील 40 वर्षीय महिला, 18 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला., माण तालुक्यातील आंधळी येथील 65 वर्षीय महिला., वाई तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदूर्जणे येथील 48, 30 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 65 वर्षीय महिला., खटाव तालुक्यातील वडूज येथील 29, 23, 24, 28 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला., जावली तालुक्यातील सायगांव येथील 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी येथील 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 41, खंडाळा येथील 75, पानमळेवाडी येथील 75, मायणी येथील 28, महाबळेश्वर येथील 17, खावली येथील 50 असे एकूण 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.
एका बाधिताचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 72 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 21 रुग्ण कोरोनाबाधित
सातारा जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 21 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचे त्यांनी कळविले आहे. यामध्ये सातारा तालुका-11, खंडाळा-2, पाटण-2, कोरेगांव -2, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर प्रत्यकी -1.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |