पतियाल : टोक्यो २०२० ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा त्याच्या पुढच्या सरावासाठी सज्ज झाला असून सध्या तो फिटनेस वर काम करत आहे. पतियालाच्या एनआयएस शिबिरात तो प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला असून आता त्याने सर्व लक्ष्य आगामी स्पर्धेत ९० मीटर भालाफेक करण्यावर केंद्रित केले आहे.
नीरजला नुकताच देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जात आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले आहे. नीरज म्हणतो, आता माझ्याबद्दल देशवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्यामुळे माझी कामगिरी खराब झाली तर जसे कौतुक झाले तसेच निंदेचे धनी होण्याची वेळ येईल याची कल्पना आहे. त्यामुळे लवकरात लवकर ९० मीटर भालाफेक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नीरजवर बायोपिक येणार असल्याची जोरदार चर्चा होते आहे. त्यासंदर्भात टाईम्सनाऊ समिट २०२१ मध्ये बोलताना नीरज म्हणाला, बायोपिक थांबू शकते, पण पदक थांबू शकत नाही. त्याला बायोपिकसाठी विचारणा झाली आहे. पण पुढचे वर्ष अधिक महत्वाचे आहे. त्या वर्षात राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत स्वतःचे रेकॉर्ड मोडून त्याला ९० मीटर भालाफेक करून आणखी पदके मिळवायची आहेत. जास्त पदके मिळविली तर त्याच्यावरचा चित्रपट अधिक हिट ठरेल अन्यथा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |