04:35pm | Jul 17, 2020 |
बुध: खटाव तालुक्यातील उत्तर भागातील डिस्कळ हे गाव गेली चार महिने ग्रामपंचायतीने व प्रशासकीय यंत्रनेने करोनापासून बचावासाठी अरोरात्र प्रयत्न केले. पण काल रात्री उशिरा येथील किराणा दुकानदार काका - पुतण्याचा करोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे या दोघे कोणामुळे बाधीत झाले हे निश्चित समजले गेले नाही. संपूर्ण गाव कंटेटमेंट झोन जाहीर केले असून त्यांच्या संपर्कातील हायरिक्समधील 16 जणांना पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, डिस्कळ येथे गेली चार महिने ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेने करोनापासुन बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित होती. दि.3 जुलैं रोजी फडतरवाडी बुध येथील महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. तत्पूर्ती ही बाधीत महिला डिस्कळ येथील किराणा दुकानात खरेदीसाठी अर्धा तास बसली होती. तर दुकानदाराची पत्नी दि. 30 जून रोजी नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे पुणे येथे गेली होती. तसेच दुकानदार खरेदीसाठी पुसेगाव, कोरेगाव, सातारा येथे गेले होते. दि.5 जून रोजी रोजी काका (वय 58 वर्षे) व पुतण्या (वय 37 वर्षे) यांना त्रास होवू लागल्यामुळे डिस्कळ येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखविण्यात आले. त्यानंतर दुसर्या दिवशी फलटण येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखविण्यात आले. दि.14 रोजी काका-पुतण्याला मायणी येथे करोना सेंटर येथे पाठविण्यात आले.
काल रात्री उशिरा त्या दोघांचाही अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे डिस्कळकरांची झोप उडाली. त्यांना सातारा येथील संजीवनी हॉस्पीटलला दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना कोठे? व कोणामुळे करोनाची बाधा झाली? हे समजू शकले नाही. प्रशासनाला माहिती मिळताच डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. माधुरी पवार, डॉ.पराग रणदिवे, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी अमोल जाधव, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, पोलीस पाटील गणेश शिपटे, सरपंच डॉ. महेश पवार, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी डिस्कळ येथे भेट देवून पाहणी केली. तसेच दोघांच्या संपर्कातील हायरिक्समधील 16 जणांना पुसेगाव येथे पाठविण्यात आले.
गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ. युनुस शेख, सपोनि विश्वजीत घोडके, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी अमोल जाधव, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, पोलीस पाटील गणेश शिपटे, सरपंच डॉ. महेश पवार यांनी गावात भेट देवून गाव संपूर्णपणे सील केले होते.
डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी घर टू घर सर्वे केला आहे. संपूर्ण गावाच्या सीमा लॉक करण्यात आल्या असून डिस्कळ गाव कंटेटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाबाधित यांचे स्टॅन्डवर किराणा मालाचे होलसेल दुकान असून बाजारपेठेत हॉटेल आहे. त्यामुळे त्यांचा संपर्कात कोणकोण आले याची माहिती घेण्याचे काम सुरू असून गावामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
विठ्ठलवाडी-चिचणी येथे दि.12 जुलै रोजी 70 वर्षीय माहिला पॉझीटीव्ह सापडली होती. त्याच महिलेच्या संपर्कात ही माहिला आली होती.त्यावेळी हायरिस्कमध्ये हया महिलेला पुसेगाव येथे हलविण्यात आले होते. काल रात्री माहिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे माहिलेच्या संपर्कातील हायरिक्समधील 6 जणांना पुसेगाव येथे हलविण्यात आले आहे. पुन्हा याच गावात सातवा करोनाबाधित रूग्ण सापडल्पाने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |