08:44pm | Nov 24, 2020 |
सातारा : दरोड्यातील गुन्ह्यासह ओमनी गाडीच्या काचा फोडून त्यातील पैसे घेऊन फरार झालेल्या कोयता गँगमधील दोघांना जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 12 जुन 2020 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास सदर बझार, सातारा येथील शिवांजली सोसायटी येथे कोयता गँगमधील युवकांनी उमेश आप्पाराव गायकवाड यांच्या डोक्यामध्ये कोयता व गुप्तीने वार करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम व इतर साहित्य जबरदस्तीने चोरून नेऊन दरोडा टाकला होता. याच टोळीने त्याच दिवशी विसावा नाका येथे ओमनी कार अडवून कारच्या काचा फोडून ड्रायव्हरच्या खिशातील पैसे चोरून नेले होते. तद्नंतर सातारा शहरात भरदिवसा कोयते नाचवून दहशत माजवली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे दोन वेगवेगळे दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यातील दोघांना यापूर्वीच अटक केली होती. इतर युवक फरार होते.
हा गुन्हा घडल्यापासून कोयता गँगमधील फरार असणारा जगदीश रामेश्वर मते हा दि. 22 रोजी शाहूपुरी सातारा येथे आपल्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाल्याने सापळा लावून त्याला अटक केली. त्याकडे त्याच्या साथीदारांबाबत कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून दि.24 रोजी सातारा शहर परिसरातून सौरभ संजय जाधव उर्फ गोट्या याला अटक करण्यात आली.
या कारवाईत सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हवालदार प्रशांत शेवाळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ, संतोष कचरे, अभय साबळे यांनी सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |