02:54pm | Aug 12, 2020 |
सातारा: केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस व शहरांतर्गत बससेवेसह सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने बुधवारी सकाळी ११ वाजता सातारा बसस्थानकासमोर डफली बजाओ आंदोलन केले. दरम्यान, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी अगदी सुरुवातीला काही नियोजन नसतानासुद्धा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. जनतेने तो स्वीकारला, परंतु त्या कालावधीत कोरोना संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाले. मोठ्या प्रमाणावर उपायोजना सुचवल्या मात्र त्यावर काही झाले नाही. त्यामुळे सततचा लॉकडाउन करून सुद्धा कोरोना वाढतो आहे. याचा विचार करून सरकारने लॉकडाउनचा पर्याय झुगारून जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
चार महिन्यात कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर तज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत, की कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता अंदाजे ८० टक्के लोकांनी दाखवली आहे. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. ५ टक्के लोक अद्ययावत वैद्यकीय उपचार घेऊनही नियंत्रणात आणता येत नाहीत. वैद्यकीयदृष्ट्या ज्यांची तब्येत गंभीर होत आहे, सरकारने या २० टक्के लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सर्व प्रयत्न किती पाहिजेत. कोरोना नियंत्रणाचे हे सूत्र ठेवले पाहिजे. १०० टक्के लोकांवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत.. अर्थव्यवस्था संकटात आहे. ८० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्याचा आढावा घेऊन सरकारने हा निर्णय तातडीने घेतला पाहिजे.
केंद्र व राज्य सरकार लॉकडाउन उठवायला तयार नसून ते काही सवलती द्यायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा तात्काळ सुरू झाल्या पाहिजेत, ही प्रमुख मागणी असून राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. एसटी बससह सार्वजनिक वाहतूक तातडीने सुरू करावी, अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
आंदोलनात चंद्रकांत खंडाईत, संदीप कांबळे, बाळकृष्ण देसाई, सुनील त्रिंबके, श्रीरंग वाघमारे, सचिन माळी, निलेश लाड, दादासाहेब केंगार, सुधाकर काकडे, शशिकांत खरात, सुनिता वाघमारे, कल्पनाताई कांबळे, सत्यवान कांबळे, सतीश गायकवाड सहभागी झाले होते.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |