09:31pm | May 24, 2022 |
पुसेगाव : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या निवडणुकीत माजीउपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी "रयत" संघटनेने विरोधकांचा 4 -2 ने धुव्वा उडवत सफाया केला. या निवडणुकीत रयत संघटनेच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्क्याने यश संपादन केले. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व माजी पं. स. सदस्य मोहनराव जाधव यांच्या ताब्यात असलेले श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या सत्तेतून पाय उतार व्हावे लागले.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे निवडणूक लागताक्षणी पुसेगाव मधील श्री सेवागिरी नागरिक संघटना, श्री सेवागिरी रयत संघटना, श्री सेवागिरी जनशक्ती संघटनांच्या प्रमुखांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. अर्ज माघारीनंतर 6 विश्वस्तांच्या जागांसाठी तिन्ही गटाचे उमेदवार 18 व अपक्ष 5 असे एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले होते. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टसाठी रविवारी 7051 मतदारांपैकी 5008 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 71.02 टक्के मतदान केले. यंदा प्रथमच श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाल्याने ट्रस्टमध्ये सत्तांतर होणार की प्रस्थापितांना संधी मिळणार याविषयीच्या चर्चेला ऊत आला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 23 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतपेट्या उघडल्यानंतर प्रथम मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात आले. वर्गीकरण झाल्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणी सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या फेरीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याची आकडेवारी समोर येऊ लागली. हळूहळू सर्वच प्रभागातील आकडेवारी समोर आल्यानंतर श्री सेवागिरी "रयत" संघटनाच बाजी मारणार हे जवळपास निश्चित झाले होते.
13 व्या फेरीअखेर रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, गौरव जाधव, डॉ. सुरेश जाधव, संतोष वाघ सहाव्या जागेसाठी रयतच्याच गणेश जाधव व सचिन देशमुख यांच्यात लढत सुरू आहे. रयतच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना 150-200 च्या फरकाच्या मतदारांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवले.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान चेअरमन व मोहनराव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विद्यमान विश्वस्त योगेश देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मतमोजणी केंद्रातील आकडेवारी जशी बाहेर पडून लागली तशी मतमोजणी केंद्राबाहेर श्री सेवागिरी रयत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीतच श्री सेवागिरी "रयत" संघटनेच्या उमेदवारांनी विरोधी संघटनेचे 4 उमेदवार विरोधी संघटनेवर थोड्या - थोड्या मतांचे लीड घेत होते. त्यामुळे श्री सेवागिरी "रयत" संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाची तर श्री सेवागिरी नागरिक संघटना व श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. पुढील प्रत्येक फेरीचे निकाल बाहेर येऊ लागले यामध्ये ही आघाडी वाढवून 150-200 मतांच्या पुढे गेली होती. मतमोजणी झाल्यानंतर श्री सेवागिरी "रयत" संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली. याच वेळी डॉल्बीच्या दणदणाटामध्ये कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते.
श्री सेवागिरी देवस्थानाचा नावलौकिक वाढविणार : संतोष जाधव
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट निवडणुकीतील विजय हा पुसेगाव मधील 7051 मतदारांचा आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेची व्याप्ती वाढविणार. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, इतर राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांसह पुसेगावकरांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वैभवात भर टाकण्यात श्री सेवागिरी रयत संघटना कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास विजयी उमेदवार संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केला.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : रयत संघटना- संतोष जाधव 2139, गौरव जाधव 1802, संतोष वाघ 1761, सचिन देशमुख 1726.
श्री. सेवागिरी नागरिक संघटना - डॉ. सुरेश जाधव 1763.
श्री सेवागिरी जनशक्ती संघटना - रणधीर जाधव 2171.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |