01:38pm | Oct 16, 2020 |
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एकाच कुटुंबातील चार मुलांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. चारही चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुलांची हत्या झाली तेव्हा त्यांचे आई-वडील घरात नव्हते. शेतमालकाला मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलीस सध्या तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला हे आपली पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी भिलाला हे पत्नी आणि एका मुलासह मध्य प्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. बोरगाव येथे त्यांची दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. शुक्रवारी सकाळी शेतमालक शेख मुश्ताक हे शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिले असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण घरात भिलाला यांची चारही मुले सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. कुऱ्हाडीने वार करत चारही भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. ही घटना समोर आल्यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पाच वर्षापूर्वी जळगाव शहराजवळील भादली गावात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या घडली होती. अद्यापर्यंत या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना अपयश आलं आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |