07:15pm | Nov 23, 2020 |
सातारा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातारा ते कराड काढण्यात येणारा पायी शेतकरी आक्रोश मोर्चाला लॉकडाउन व आचारसहिता याचे कारण देऊन पोलिसांनी परवानगी नाकारली. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने दि. ५ डिसेंबर रोजी मागण्यांसंदर्भात बैठक घेऊन त्यामध्ये तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र बैठकीत तोडगा न निघाल्यास कराड येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिला.
सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी एकरकमी ऊसदर द्यावा, जे साखर कारखानदार देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जदारांना जाहीर केलेले ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे. लॉकडाउन काळातील घरगुती तसेच व्यावसायिकाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे. सातारा जिल्ह्यातील शेतीपंपाचे थकित असलेले वीजबिल माफ करून सक्षम यंत्रणा नेमून पुढे योग्य पद्धतीने ते वसुल करावे. गाईच्या दुधाला दिले जाणारे ५ रुपये अनुदान तातडीने सुरू करावे. केंद्र शासनाने आणलेले शेतकरीविरोधी कृषिविषयक महाराष्ट्रात लागू करू नये या मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सातारा ते कराड शेतकरी आक्रोश पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
राजू शेट्टी आज सकाळी ११ वाजता पोवई नाका येथे आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तदनंतर तेथून ते मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पोलिसांनी अडवला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी पाठवलेला एक सक्षम अधिकारी दाखल झाला. राजू शेट्टी यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तद्नंतर पोलीस अधिकारी, संबंधित अधिकारी व राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने दि. ५ डिसेंबर रोजी मागण्यांसंदर्भात बैठक घेऊन त्यामध्ये तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |