03:03pm | Aug 03, 2020 |
फलटण : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग बनवण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया चालु आहे. ठिकठिकाणी शेतकर्यांच्या जागेचे भूसंपादन प्रक्रियेसाठी भुमापन होऊन त्याचा मोबदला ठरवला गेला आहे किंवा दिला गेलेला आहे. परंतु जमीन जाणार की नाही किंवा मोबदला मिळणार की नाही, याबाबत प्रशासनाच्या गलथानपणाच्या कारभारामुळे आळंदी - पंढरपूर रोडवरील वडजल येथील शेतकर्यांमध्ये व व्यापार्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी वडजलमधील शेतकरी व व्यापारी यांचेकडुन शिवसेनेकडे निवेदन देण्यात आले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
सन 2017-18 पासून वडजल येथील शेतकरी आमची जागा भूसंपादीत केली जाणार आहे की नाही व भूसंपादन झालेच तर त्याचा मोबदला मिळणार आहे की नाही याबाबत तेथील ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. कारण एकीकडे फलटण भुमी अभिलेख कार्यालयाने वडजलकर ग्रामस्थांची जमीन भूसंपादन प्रक्रियेत जात नसल्याचे लेखी पत्राद्वारे ग्रामस्थांना कळवले आहे. तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी वडजल येथे भूसंपादन प्रक्रियेची सुरुवात म्हणून भुमापन करुन ठिकठिकाणी खुणा करुन खांब रोवलेले आहेत. तसेच तेथील भूसंपादीत जागेत येणारी झाडे, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, इतर वेगवेगळ्या प्रकारची दुकाने यावर खुणा केलेल्या असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
वरील सर्व प्रकार संभ्रम निर्माण करणारा असल्याने वडजलकर ग्रामस्थ त्याचा पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासनाच्या या अशा गलथानपणाच्या कारभारामुळे शेतकर्यांवर टांगती तलवारीसारखा प्रकार झाला असुन सगळीकडे हेलपाटे मारुन शेतकर्यांनी शेवटी सदर प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन मागणी केली आहे.
प्रदिप झणझणे यांनी तात्काळ भुमी अभिलेख फलटण तालुका उप अधिक्षक शिल्पा जवक व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे दत्तात्रय साळुंखे यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधून सविस्तर चर्चा केली व योग्य मार्ग काढुन शेतकर्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच शेतकर्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली आहे.
शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांना सह्यानिशी निवेदन देताना अतुल चव्हाण, राहुल पिसाळ, उमेश तांबे, सतीश ढेंबरे, नाथा तांबे, विठ्ठल सूळ, गणेश पिसाळ, शशिकांत डिसले आदी वडजलकर ग्रामस्थ उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |