08:33pm | May 24, 2022 |
सातारा : सातारा पालिकेने मंगळवारी शाहू चौकातील अजिंक्य मटण शॉप बगाडे हॉस्पिटल या दरम्यानची अतिक्रमणे हटवली. अतिक्रमण मोहिमेदरम्यान टपरीधारक आणि पालिकेचे कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र अतिक्रमण विभागाने कोणालाही न जुमानता धडक कारवाई केल्याने शाहू चौक ते महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला.
सातारा शहरांमध्ये मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव विभागाने धडक कारवाया सुरू केल्या आहेत. सोमवारी हुतात्मा उद्यान परिसर साफ केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून शाहू चौकात मोहिमेला प्रारंभ झाला. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्यासह वीस कर्मचारी एक जेसीबी, दोन टिपर अशी यंत्रणा कामाला जय्यत तयार होती. या चौकामध्ये काही टपऱ्यांची झालेली अतिक्रमणे वाहतुकीला अडचणीची ठरत होती. यासंदर्भात लोकशाही दिनामध्ये तक्रारी झाल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ही अतिक्रमण हटविण्याचे तातडीचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार प्रशांत निकम यांनी ही सर्व टपऱ्यांची अतिक्रमणे हटवली. यावेळी कोणत्याही दबावाला आणि फोनाफोनी ला भीक न घालता पालिकेने धडाक्यात सर्व टपऱ्या उचलून नेल्या. टपरी चालक आणि पालिकेचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या मध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र निकम यांनी आक्रमक पवित्रा घेताच संबंधितांचा सूर नरमला. यानंतरही सदरबाजार, गोडोली, एसटी स्टँड परिसर, राधिका चौक या ठिकाणी या पुढील दिवसांमध्ये कारवाई करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या दरम्यान कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |