09:43pm | Feb 11, 2021 |
कराड : कराडमध्ये एका सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये आणखी एकाचा समावेश असल्याचे समजले असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जानेवारी रोजी शेणोली ता.कराड गावचे हद्दीत सोनसळ ते शेणोली जाणार्या रस्त्यावर संजयनगर बसस्टॉपवर दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवरून येवून जोराचा हिसडा मारून एका महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसुत्राची चोरी केलेली होती. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कराड परिसरात चैन स्नॅचिग करणार्या गुन्हेगाराबाबत खास गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सोनकिरे ता. कडेगाव येथील इसम सोनसाखळी चोरी करत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील झालेल्या सोनसाखळी चोरीची माहिती घेवून त्यास ताब्यात घेतले असता संबंधिताकडून कराड तालुका पो.ठाणे हद्दीतील शेणोली येथील चैनस्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी एका इसमाचे नाव समजून आले आहे. त्या इसमाचा शोध सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या इसमास पुढील कारवाई कामी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक विजय गोडसे सहा.पोलीस निरीक्षक, सफौ राजेंद्र पुजारी, पोहवा सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुखे, तानाजी शिंदे, पोलीस कॉस्टेबल विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी केलेली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |