05:40pm | Dec 02, 2021 |
सातारा : सातारा तालुक्यासह परिसरात बुधवारपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटामध्ये दरड कोसळली आहे. तर दुसरीकडे मांढरदेवी घाटात सुद्धा दरड कोसळली आहे. या कोसळलेल्या दरडीमुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सावधानता बाळगून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाका बसला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले असताना आता दरडी कोसळण्याच्याही घटना समोर येवू लागल्या आहेत. हिवाळ्यात महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. अशावेळी वाई येथून पाचगणी, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पसरणी घाटात दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला दरड कोसळली आहे. यामुळे काहीकाळ या घाटातील वाहतूक बंद होती.
वाई शहरातून पुढे मांढरदेवी घाटातून काळूबाई देवीला जाणाऱ्या मार्गावरही दरड कोसळली आहे. दोन्ही मार्गावर बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर पसरणी घाटातही काही काळानंतर वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. घाटात अवकाळी पाऊस, धुके व ढगाळ वातावरण यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू होती.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |