11:03pm | Sep 17, 2020 |
सातारा : गुरुवारी जिल्ह्यात 790 जण बाधित निष्पन्न झाले, तर 31 जणांचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच कोरोनातून बरे झाल्याने 670 नागरिकांना दिला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून मृत्यूदर वाढत असल्याचेच चित्र आहे. याचबरोबर कोरोनामुक्तांच्याही संख्येत वाढ होत असल्याने किंचित समाधान मानावे लागेल. मात्र रोजची बाधितांची आकडेवारी प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंता वाढवित आहे. गुरुवारी जिल्ह्यात 790 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 28 हजारांच्या पुढे म्हणजेच 28 हजार 152 एवढा झाला आहे. तर 31 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 783 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 670 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 17 हजार 777 वर पोहोचली आहे. 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
31 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शिवनगर येथील 64 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, वडूथ येथील 35 वर्षीय पुरुष, करंजे येथील 70 वर्षीय पुरुष, प्रतापगंजपेठ सातारा येथील 75 वर्षीय् पुरुष, आंबळे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 72 वर्षीय व 70 पुरुष, महादेवनगर फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, जाधववाडी फलटण येथील 55 वर्षीय् पुरुष, तरडगाव फलटण येथील 65 वर्षीय व 87 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, कुळकजाई दहिवडी येथील 84 वर्षीय पुरुश्, मलकापूर कराड येथील 70 वर्षीय पुरुष, विलासनगर संगमनगर सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, देशमुखनगर खोजेवाडी, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, आझाद चौक कोरेगाव 74 वर्षीय महिला, वडूज खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, शाहुपुरी 73 वर्षीय पुरुष, पाटखळ सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, तडवळे कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 84 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले कराड येथील 4, कोरेगाव येथील 1, सातारा येथील 1 असे एकूण 31 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 35, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 83, वाई 124, खंडाळा 109, रायगांव 80, पानमळेवाडी 73, मायणी 56, महाबळेश्वर 65, पाटण 24, दहिवडी 31, खावली 100, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 128 असे एकूण 977 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |