सातारा : सातारा जिल्ह्यात असणार्या फलटण तालुक्यातील सरडे गावापासून सुरू झालेली तिरंदाजीची कमाल आज टोकियोतील ऑलिम्पिकपर्यंत प्रविणला घेऊन गेली. दुसर्या फेरीत त्याच्या जागतिक विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या असल्या, तरी पदार्पणातच आपली झलक जगाला दाखवलेला प्रविण आज जगभरातील तज्ज्ञाच्या नजरेत भरला.
तिरंदाजीच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्रातील सातारच्या आणि फलटणच्या या सुपुत्राने 6 विरुध्द 0 अशी सुरवात करीत पहिला सामना जिंकला आणि फलटणमध्ये जल्लोष झाला. त्याने जगातील दुसर्या क्रमांकावरचा तिरंदाजीचा खेळाडू गालसन बाजारझापोव याला हरवले. दुसर्या फेरीत त्याची लढत जागतिक स्तरावरील प्रथम क्रमाकावरील अमेरिकेच्या एलिसन बाडीसमवेत झाली. ब्राडीने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व ठेवले.
पहिल्या सेटमध्ये ब्राडीला 28 तर प्रविण जाधवला 27 गुण मिळाले. दुसर्या सेटमध्ये ब्राडीने 27 तर प्रविणने 26 गुण मिळवले, तिथेच दुसर्या फेरीच्या लढतीचा निकाल जवळपास ठरला होता. मात्र तिसर्या सेटमध्ये ब्राडीने 26 आणि जाधवने 23 गुण मिळवल्याने पहिल्या सामन्यात 6-0 ने जिंकलेला प्रविण दुसर्या सामन्यात मात्र 6-0 ने हरला.
प्रविण जाधवची पार्श्वभूमी
मु. पो. सरडे, ता. फलटण, जि. सातारा हे त्याचे जन्मगाव. ऐतिहासिक तालुक्यातील या सुपुत्राने ऐतिहासिक कामगिरी केली. सरडे गावचा हा सुपुत्र सन 2016 मध्ये भारताच्या नकाशावर झळकला. त्याने आशिया चषकात भारतीय तिरंदाजी संघाचे प्रतिनिधित्व केले. तर सन 2020 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताला त्याने रौप्यपदक मिळवून दिले. लष्करात असलेल्या प्रविणने केलेली ही कामगिरीच त्याला टोकिओ ऑलिम्पिकपर्यंत घेऊन गेली. सरडे गावात शेतमजूरी करणार्या कुटुंबातील प्रविणने मिळवलेले यश फलटणच नव्हे तर सातारा व संपूर्ण राज्यातील कष्टातून जिद्दीने ध्येयाशी लढणार्या सर्वानाच प्रेरणादायी असेच आहे. सरडेकरांची त्याने ऑलिम्पिकमध्ये विजेतेपद मिळवून गावाचे व राज्याचे नाव उजळवावे ही इच्छा होती. ती इच्छा आज अपूर्ण राहीली असली तरी त्याने पहिल्या सामन्यात जी तडफ दाखवली व जागतिक दर्जातील दुसर्या क्रमांकाच्या उपविजेत्याला हरवले, तेही नसे थोडके.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |