10:05pm | Jun 02, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात आज 23 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आता जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 223 झाली आहे. याचबरोबर आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 23 पर्यंत पोहोचला आहे. तसेच जावली तालुक्यातील कोरोना रूग्ण आढळलेल्या कावडी, रांजणी व मुनावळे (अंतर्गत कळकोशी वस्ती) गावांना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
कृष्णा रूग्णालयाने कालच कोरोनामुक्तीची सेंच्युरी केली असून आजही येथून आणखी 11 कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली. कराड तालुक्यातील खालकरवाडी (चरेगाव) येथील 25 वर्षीय युवक, इंदोली येथील 37 वर्षीय महिला, 12 व 14 वर्षीय मुली, म्हासोली येथील 55, 30, 55 वर्षीय महिला व 9 वर्षीय मुलगा, पाटण तालुक्यातील शिरळ येथील 25 वर्षीय युवक, खाले येथील 21 वर्षीय महिला, बनपुरी येथील 16 वर्षीय युवक असे 11 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
खावली येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे 8 जण आज कोरानातून पूर्णपणे बरे झाले. यामध्ये खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 1 पुरुष व 2 महिला, मांजरवाडी येथील 1 महिला, सातारा तालुक्यातील कुस खुर्द येथील 1 पुरुष व 2 महिला, कोरेगाव तालुक्यातील फलेवाडी येथील 1 महिला असे 8 तसेच रायगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे 4 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले. यामध्ये सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील 42 व 44 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील 32 वर्षीय पुरुष व चंचळी येथील 29 वर्षीय पुरुष अशा 4 कोरोनामुक्तांचा समावेश आहे. असे एकूण 23 बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर विविध ठिकाणावरून 223 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 25, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 52, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 58, वाई ग्रामीण रुग्णालय येथील 7, खंडाळा येथील 33 व कोरेगांव येथील 9 अशा एकूण 184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दि. 22 मे रोजी दाखल असलेला अंधोरी (ता. खंडाळा) येथील 43 वर्षीय (सारीचा रुग्ण) कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच रांजणी (ता. जावली) येथील मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 85 वर्षीय महिलेचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. तसेच हडपसर (पुणे) येथून प्रवास करुन आलेला 27 वर्षीय पुरुष व मुंबई येथून प्रवास करुन आलेला वेळेकामथी (ता. सातारा) येथील 59 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू प्रश्चात नमुना तपासणीकरिता पुणे येथे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जावली तालुक्यातील कावडी, रांजणी व मुनावळे ग्रामपंचायत अंतर्गत (कळकोशी) क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |