09:37pm | Jan 21, 2021 |
सातारा : सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांचे पती राम हादगे यांनी सातारानामा न्यूज पोर्टलचे संपादक संदीप शिंदे यांना पालिकेत मंगळवारी विरोधात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून शिविगाळ केली. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी मध्यस्थी केल्याने फार तणाव वाढला नाही.
पत्रकार संदीप शिंदे यांनी आपल्या विरोधात बातमी लिहून काही व्हिडिओ शूटिंग केल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांचे पती राम हादगे यांना समजली. हादगे यांनी पत्रकार शिंदे यांना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या केबिनमध्ये बोलावले. शेंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत तू माझे व्हिडिओ शूटिंग का केले? असा जाब हादगे यांनी विचारत शिंदे यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि पत्रकारांना अजिबात जुमानत नाही अशी उध्दट भाषा वापरली.
शिंदे व हादगे यांच्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीतच होणार होते. मात्र उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी केल्याने फार तणाव वाढला नाही. मात्र पालिकेतील महिला सभापतींच्या पतींचे उद्योग या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. सातारा शहर पत्रकार संघाच्यावतीने या प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे. शिंदे यांनी तक्रार दिल्याने सातारा शहर पोलिसांनी राम हादगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्रकारांचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांना याप्रकरणी निवेदन देणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |