04:56pm | Jan 27, 2022 |
कराड : प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने येथील विजय स्तंभासह माजी संरक्षणमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा व लष्करी विमान आणि रणगाड्यावर प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
कर्नल संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली २३ वर्षे बांगला मुक्ती संग्रामातील विजयाप्रीत्यर्थ कराडमध्ये १४, १५ व १६ डिसेंबर रोजी विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करून विजय दिवस साजरा केला जातो. तसेच वर्षभर युवकांना प्रेरणादायी असे विविध कार्यक्रमही राबवले जातात. आजचा राष्ट्रीय मानचिन्हांवर पुष्पार्पण कार्यक्रम हा त्याचाच एक होता.
यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रविण ताटे, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक विनायक पावसकर, सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, उद्योगपती सलिम मुजावर, दीपक अरबुने, विनायक विभुते, वृक्ष मित्र चंद्रकांत जाधव, सहसचिव विलासराव जाधव, प्र. प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, प्रा. बी.एस. खोत, प्रा. महालिंग मुंडेकर, प्रा. रजनिश पिसे, रत्नाकर शानभाग, प्रा. जालिंदर काशिद, रमेश पवार, संतोष पवार, लष्करातील माजी अधिकारी, जवान, पत्रकार हेमंत पवार यांच्यासह मिलिटरी ऑफिसर ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थिनी आणि विठामाता विद्यालयातील एन.सी.सी.च्या विद्यार्थिनी आदी मान्यवर व महिला उपस्थिती होत्या.
दरम्यान, गीतकार बाळ देवधर यांनी लिहिलेले देशभक्तीपर "आजादी" हे गीत बाळ देवधर, अतुल कुलकर्णी, चिन्मय जगधने, भूषण नानावटी, गणेश लाड, आकांक्षा आळणे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले. हरीभाऊ कुलकर्णी यांनी बासरीवर वंदेमातरम, राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |