बुध: कोविड 19 मुळे गेले सहा महिने शालेय विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत जाता येत नाही. मित्रांना भेटता येत नाही की मनमोकळे खेळता येत नाही. या कोंडलेल्या परिस्थितीत येथील नागनाथ विद्यामंदिरातील बाळगोपाळांना त्यांच्या पाठ्यपुस्तकात धडा लिहिणार्या लेखकाचीच थेट भेट घडवून सुखद आनंदाचा धक्का दिला. ही भेट घडविण्याची तांत्रिक किमया केली तीही चिमुकल्यांनीच सध्या सातारा येथे शिकत असलेल्या यश आणि सायली घाडगे या मुळच्या बुध येथील भावंडानी गावातील आपल्या सोबत्यासाठी ऑनलाईन लेखक भेटीचे संयोजन केले.
सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वाढलेले प्रसिध्द खानदेशी लेखक आबा महाजन यांच्या ऑनलाईन भेटीचा योग या दोघांनी जुळवून आणला. ‘आबांची गोष्ट’, ‘गंमतीच्या राज्यात’, ‘ठोंब्या’, ‘चिऊचा मोबाईल’ या सारखे लेखन ‘खाणदेशी गाव’, ‘मन्हा गावले’ असे काव्यसंग्रह अशी विपुल साहित्य संपदा आबा महाजन यांच्या नावावर आहे. महाजन यांच्या कविता व धडे बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. प्राचार्य शेखर राजेघाटगे यांच्या संकल्पनेतून स्थानिक पंचायत, प्रशाला व माजी विद्यार्थी संघ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
लेखक भेटीच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्रा.डॉ. अशोकराव करांडे होते. या कार्यक्रमात वर्हाड खानदेशच्या ग्रामीण भागातील पूर्वीच्या काळातील शिक्षणाची परवड आणि त्यातून मुलीच्या शिक्षणाचे होणारे हाल याचे वास्तव चित्रण आबा महाजन यांनी मुलांपुढे उभे केले. लहानपणापासून वाचनाचे संस्कार मिळत गेले तर व्यक्तीमत्वाला एक वेगळी उंची व खोली लाभते, असे वाचन उभरत्या वयामध्ये मिळणे ही सुद्दा एक भाग्याची बाब आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नंतरच्या आयुष्यात कितीही प्रतिकुल परस्थिती समोर आली तरीही अंगभूत ताकद व प्रतिभेच्या पाठबळावर आपण जगापुढे आदर्श निर्माण करू शकतो, असा विश्वास मुलांमध्ये जागविला.
गावखेड्यामध्ये अनुभवाला येणारे भावविश्व संवेदनशीलतेला पूरक असे असते. जाणीवपूर्वक निरीक्षणातून सुयोग्य शब्द स्फुरतात व त्यातून मग साहित्य निर्मितीला चालना मिळते. असा स्वानुभव त्यांनी मुलांपुढे मांडला. आईवडील व गाव यांना कधीही न विसरण्याची भावना शाळेतील संस्कारातून द्दढ बनत जाते असे त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ. अशोकराव करांडे यांनी खाणदेशच्या मातीचे साहित्य क्षेत्रातील योगदान विशद करून योग्य वयात योग्य वाचन साहित्य उपलब्धा व गोडी योग्य वळण देणारे घटक असल्याचे सांगितले.लेखक भेटीच्या या कार्यक्रमात अर्जुन फडतरे, डॉ. अशोक घाडगे, दत्तात्रय बोराटे, योगेश फरकुटे, प्राध्यापक श्री. कांबळेसह शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक प्रा. काळोखे यांनी केले. भगवान सरवदे यांनी आभार मानले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |