10:18pm | Apr 17, 2023 |
सातारा : वाघोली, ता. कोरेगाव येथे जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्याला गोळ्या घातल्याची घटना घडली असून सासरा सुनील शंकर भोईटे वय ४८ याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत सुनील भोईटे यांचे बंधू नामदेव भोईटे यांना दोन विवाहित मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. नामदेव यांचा जावई रवी यादव याने नामदेव यांच्या हिश्याची जमीन विकली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे. तो दावा सुनील भोईटे यांनी दाखल केलेला आहे, अशीही माहिती मिळाली आहे. यावरून नामदेव भोईटे यांचे जावई आणि सुनील भोईटे यांच्यात वादविवाद झाले होते. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नामदेव यांचे जावई रवी यादव व सुनिल यादव या दोघांनी वाघोली येथे सुनील भोईटे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे निघाले असताना त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले. त्यावेळी भोईटे यांचा मुलगा माझ्या वडिलांना मारू नका म्हणुन हात जोडून विनवण्या करीत होता. मात्र, तरीही रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात व छातीत तीन गोळ्या घातल्या. गोळ्या वर्मी लागल्याने सुनील भोईटे यांना तातडीने पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच भोईटे यांचा मृत्यू झाला.
रवी यादव व सुनिल यादव यांचे मुळगांव सोळशी ता. कोरेगाव हे असून ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असतात. गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोघेही स्वत:हून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेसंदर्भात वाठार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |