02:51pm | Jan 03, 2021 |
नवी दिल्ली : केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास शनिवारी 38 दिवस पूर्ण झाले. दरम्यान, गाझीपूर सीमेवर कश्मीरसिंग नावाच्या शेतकर्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले की, अखेर कुठपर्यंत आपण येथे थंडीत बसून राहणार, सरकार ऐकत नसल्याने जीव देत आहे, म्हणजे तोडगा निघेल. गाझीपूर सीमेवरच अंत्यसंस्कार करण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
75 वर्षांचे कश्मीरसिंग सुरुवातीपासून मुलगा व नातवासोबत दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. त्रस्त होऊन शनिवारी त्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या शौचालयात जाऊन फाशी घेतली. याआधी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सीमेवर 55 वर्षांचे शेतकरी गलतानसिंग यांचा थंडीमुळे मृत्यू झाला होता. या आंदोलनात आतापर्यंत आत्महत्या व इतर कारणांनी 40 शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकर्यांच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे (बीकेयू-टिकेत) प्रदेशाध्यक्ष बिजेंद्र यादव यांनी कोणत्याही स्थितीत आंदोलक शेतकर्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाव्यात, अशी मागणी केली, तर केंद्राने कायदे रद्द केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला.
कुंडली आणि टिकरी सीमेवरून 6 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढला जाईल. 15 जानेवारीपर्यंत भाजप नेत्यांना घेराव घालण्यात येईल. नंतर 23 जानेवारीला राजभवनपर्यंत मार्च काढला जाईल. 26 जानेवारीला दिल्लीत शेतकरी प्रजासत्ताक परेड काढण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. दरम्यान,शेतकरी कुटुंबातील किमान एकाने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केले.
अटक केलेल्या परप्रांतीय टोळीवर स्फोटक पदार्थ बाळगल्याचाही गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
वाळूचोरी प्रकरणी एकावर गुन्हा |
धामणेर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
महिलेने केले विषारी औषध प्राशन |
सुरूर उड्डाण पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर |
शेंद्रे येथील डॉक्टरचे केले खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर |
बनावट सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद |
भाजप प्रदेश महिला मोर्चाचे सातार्यात चक्काजाम आंदोलन |